अखिलेश यांची माघार, चारही मंत्र्यांची मंत्रिमंडळात वापसी

October 25, 2016 3:18 PM0 commentsViews:

sp-leaders

25 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील सत्तासंघर्षात मंत्र्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग आजही सुरुच आहे. कारण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हकालपट्टी केलेल्या चार मंत्र्यांचं अवघ्या 48 तासांत पुनरागमन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अखिलेश यादव यांनी 23 ऑक्टोबर रोजी काका शिवपाल यादव, ओमप्रकाश सिंह, नारद राय आणि शादाब फातिमा यांची मंत्रिपदं काढून घेतली होती. मात्र आता ते मंत्रिमंडळात परत येणार आहे.

काका शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांच्या हकालपट्टीचा बदला म्हणून अखिलेश यांचे निकटवर्तीय रामगोपाल यादव यांची पक्षातूनच हाकालपट्टी केली होती. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अखिलेशने सरकार चालवावं, तर शिवपालने पक्ष चालवावा, असा आदेश देत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी पक्षातील सत्तासंघर्षावर तात्पुरती मलमपट्टी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close