पाकिस्तानी कलाकारांची बॉलिवूड कमाई आहे किती?

October 25, 2016 3:20 PM0 commentsViews:

25 ऑक्टोबर: पाकिस्तानी कलाकारांवरून भारतात एवढं रामायण झालं. पण हे पाकिस्तानी कलाकार भारतात बॉलिवूडमध्ये येतात ते कमाईसाठी. बॉलिवूडमध्ये त्यांना मिळणारं मानधन हे नेहमीच जास्त असतं.
पाहू या कुठल्या कलाकाराला किती मानधन मिळतं ते.

फवाद खान- आतापर्यंत फवादनं बॉलिवूडमध्ये तीन सिनेमांमध्ये काम केलंय. एका सिनेमासाठी तो 2 कोटी रुपये घेतो. इतर काही शोजमध्येही काम करतो. याची वर्षाची कमाई आहे 12 कोटी.

अली जफर – ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या सिनेमांत त्यानं काम केलंय.एका सिनेमासाठी अली घेतो 3 कोटी रुपये.

माहिरा खान – रईस सिनेमातून माहिराची बॉलिवूड एन्ट्री होतेय. रईससाठी माहिरानं किती पैसे घेतलेत ते नक्की कळलं नाहीय, पण माहिरा टीव्ही शोसाठी दिवसाला 3 लाख रुपये घेते.

आतिफ असलम – या पाकिस्तानी गायकानं आतापर्यंत 50 सिनेमांसाठी गाणी म्हटलीयत. तो सर्वात जास्त फी घेणारा कलाकार आहे. एका स्टेज शोसाठी तो 35 लाख रुपये घेतो.

राहत फतेह अली – बॉलिवूडसाठी त्यांनी 100हून अधिक सिनेमांसाठी गाणी म्हटलीयत. एका गाण्यासाठी ते 15 लाख रुपये घेतात.

वीना मलिक – अनेक भारतीय शोजसाठी तिनं काम केलंय. एका प्रोजेक्टसाठी तिची फी आहे 5 ते 10 लाख रुपये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close