‘रॉक ऑन 2’ची टीम रॉक्स!

October 25, 2016 4:39 PM0 commentsViews:

rockon2poster

25 ऑक्टोबर: ‘रॉक ऑन 2’चं ट्रेलर दिमाखदारपणे लाँच झालं. यावेळी सिनेमाच्या टीमनं परफॉर्मन्ससोबत ‘रॉक ऑन 2’चे अनुभवही शेअर केलं.

यावेळी अभिनेता आणि गायक फरहान अख्तर, सिनेमाचा निर्माता रितेश सिदवानी, अभिनेता पूरब कोहली,श्‌्ा्रद्धा कपूर,प्राची देसाई आणि शशांक अरोरा उपस्थित होते.यावेळी फरहान अख्तर म्हणाला की, ‘ हा रॉक ऑनचा सिक्वल आहे. त्यामुळे कथा आधीच्या व्यक्तिरेखांभोवतीच फिरते.पण आता वेगळ्या घटना आणि वळणं आहेत. मॅजिक बँडचाच हा पुढचा प्रवास आहे.’

फरहान अख्तर म्हणाला की, पहिला सिनेमा हा चार तरुणांवर होता. आता बँडमध्ये एका नव्या तरुण संगीतकाराची भर पडलीय. शशांक अरोरा ही नवी व्यक्तिरेखा रॉक ऑन 2मध्ये आहे.शशांकनं सिनेमात काम करतानाचे अनुभव शेअर केले. तो म्हणाला, रॉक ऑन सिनेमा क्लासिक सिनेमा होता. तेव्हा या सिक्वलमध्ये काम करताना दडपण नक्कीच होतं. पण इथे प्रत्येक जण एखाद्या कुटुंबाप्रमाणे वागत होतं. म्हणूनच काम करताना मजा आली.

प्राची देसाई एकदम इमोशनल झाली. ती म्हणाली, माझी सुरुवातच झाली ती रॉक ऑन सिनेमानं. आठ वर्ष झाली. मी आता या सिक्वलमध्येही आहे.माझी व्यक्तिरेखा आता परिपक्व झालीय. आणि तिचं लूकही एकदम वेगळं आहे. प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल. फरहाननं बॉलिवूडमध्ये 15 वर्ष पूर्ण केलीयत. 2001मध्ये त्यानं दिल चाहता हैचं दिग्दर्शन केलं होतं. तो सिनेमा सुपरडुपर हिट झाला एक अभिनेता, दिग्दर्शक, गायक,लेखक म्हणून आपल्या प्रवासाबद्दल बोलताना तो म्हणाला, तुम्ही एखाद्या कामात स्वत:ला झोकून दिलं तर आव्हानं जाणवत नाहीत. कामाचं समाधान मिळतं. तुम्ही आनंदानं काम करता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close