बँक ऑफ महाराष्ट्रनेही 34 हजार एटीएम कार्ड केले ब्लॉक

October 25, 2016 4:41 PM0 commentsViews:

bank_of_maharshtra325 ऑक्टोबर : एटीएम कार्डच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आता बँक ऑफ महाराष्ट्रनंही 34 हजार एटीएम कार्ड ब्लॉक केले आहेत. यात 21 हजार कार्ड हे व्हिसा कार्ड तर 13 हजार रुपे कार्डसचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांत ग्राहकांचे एटीएम कार्ड हॅक करुन त्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचं प्रमाण वाढल्यानं अनेक बँकांनी एटीएम पीन तात्काळ बदलण्याचं आवाहन ग्राहकांना केलं होतं. तर काही बँकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून एटीएम कार्ड ब्लॉक केलेत. स्टेट बँकेनं काही दिवसांपुर्वीच त्याचे सहा लाख एटीएम कार्ड ब्लॉक केलेत. महाराष्ट्र बँकेच्या एटीएमसंदर्भात अजून तरी कुठलाही गैरव्यवहार झाल्याची घटना झाली नाहीये, पण खबरदारीचा उपाय म्हणून हे कार्डस ब्लॉक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर नरेंद्र काबरा यांनी दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close