अकोला : निधी देत नाही म्हणून नगरसेवकांनी भीक मागून गोळा केले 800 रुपये !

October 25, 2016 4:53 PM0 commentsViews:

akola32325 ऑक्टोबर : अकोला महापालिकेत निधी असूनही देत नसल्याचा आरोप करत भर सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भीक मांगो आंदोलन करून 800 रुपयांचा निधी गोळा करून आयुक्तांना दिला. या गोंधळात भारिपच्या नगरसेवकाने डाएस फेकून माईक फोडला.

अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक राजू मूलचंदानी यांनी आपल्या प्रभागातील उघड्या असलेल्या नाल्यांवर झाकण टाकण्यासाठी 25 हजाराचा निधी मागितला पण निधी नसल्याचं भाजप महापौरांनी उत्तर दिलं होतं. याचाच रोष आज सभेत पाहायला मिळाला. मागील सभेचे राहिलेली विषयांवर आज महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, राजू मूलचंदानी यांना निधी उपलब्ध न करून दिल्याने. संतप्त विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभेतच भीक मांगो आंदोलन करून, इतर नगरसेवकांकडून 800 रुपयांचा निधी गोळा केला. आणि हा निधी महापालिकेच्या विकासासाठी आयुक्तांना देण्यात आला. भारिप-बहुजन महासंघाचे गटनेता गजानन गवई यांनी, डाएस फेकून माईक फोडला. या प्रकारानंतर लगेच सभा तहकूब करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close