‘टाटा’ विरोधात सायरस मिस्त्रींची कायदेशीर लढाई

October 25, 2016 5:24 PM0 commentsViews:

cyrus mistry and ratan tata25 ऑक्टोबर : टाटा उद्योगसमुहातून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आलीये. मात्र, हा वाद आता पेटण्याची चिन्ह आहे. सायरस मिस्त्री यांनी टाटा समुहाविरोधात राष्ट्रीय कंपनी लवादाकडे कॅव्हेट दाखल केलीये. तर टाटासमुहानेही सायरस मिस्त्रींविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्रींना अचानक हटवण्यात आलंय. सायरस मिस्त्री यांनी त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर रतन टाटांविरोधात राष्ट्रीय कंपनी लवादाकडे कॅव्हेट दाखल केलंय. रतन टाटा, टाटा उद्योगसमूह आणि आणि दोराबजी टाटा यांच्याविरोधात ही कॅव्हेट दाखल झाली आहे.

तर टाटा उद्योगसमुहानेही सायरस मिस्त्रीविरोधात मुंबई हायकोर्टात आणि राष्ट्रीय कंपनी लवादाकडे कॅव्हेट दाखल केली आहे. अत्यंत सचोटीने व्यवहार करणा•या टाटा उद्योगसमूहामध्ये चेअरमन झाल्यावर सायरस मिस्त्रींची काम करण्याची पद्धत टाटा सन्समध्ये शेअर्स असणा•या ट्रस्टना न आवडल्याने सायरस मिस्त्रींची हकालपट्टी करण्यात आलीये. आता यावरून न्यायालयीन लढाई सुरू होण्याची चिन्हं आहेत.

कॅव्हेट म्हणजे काय ?

 कुणीही कोर्टात जाणार असेल, मात्र ज्याने पहिल्यांदा कोर्टात कॅव्हेट दाखल केलय, त्याची बाजू ऐकल्याशिवाय कोर्टाला निर्णय देता येणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close