मॉडेल अर्शी खानचं हडपसर सुधारगृहातून पलायन

October 25, 2016 6:11 PM0 commentsViews:

arshi_khan425 ऑक्टोबर : नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारी मॉडेल अर्शी खानने पुण्यातील हडपसर सुधारगृहातून पलायन केलंय. तिने कर्मचाऱ्यांवर हल्ला करून दलालाच्या मदतीने पळ काढल्याचं कळतंय.

काही दिवसांपूर्वी अर्शी खानला सोशल सर्व्हिस सेलने एका हॉटेलमधून अटक केली होती. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला हडपसर येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, अर्शी खानने आपल्या दलालाच्या मदतीने येथून पळ काढला. कर्मचा-यांवर हल्ला केल्याचंही बोललं जातंय. विशेष म्हणजे या आधीही या सुधारगृहातून महिला पळून गेल्या होत्या. अर्शी खान ही प्रसिद्ध मॉडेल असून ती तमिळ चित्रपटात काम करतेय. मध्यंतरी तिने पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close