संतापजनक !, गुप्तांगाला सिगारेटचे चटके देवून चिमुरडीला अमानुष मारहाण

October 25, 2016 6:35 PM0 commentsViews:

vadala_rape_caseऔरंगाबाद, 25 ऑक्टोबर : एका तीन वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला गुप्तांगाला सिगारेटचे चटके देवून अमानुष मारहाण कऱण्यात आल्याची संतापजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीये. शहरातल्या सिडको परिसरात पोलिसांनी एका कुंटणखान्यावर छापा टाकला त्यातही घटना समोर आली.

अनोळखी व्यक्तीनं पोलिसांच्या दामिनी पथकाला चिमुरडीच्या अत्याचाराची माहिती दिली. दामिनी पथकानं ज्या घरात अत्याचार सुरू होता त्या घरावर अचानक छापा टाकला. त्यावेळी त्या घरात कुंटणखाना चालत असल्याचं पथकाला आढळून आलं. पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणा-या महिलांसह सहा जणांना अटक केलीय.

त्यावेळी एका चिमुरडीचीही सुटका करण्यात आलीये. या चिमुरडीवर अमानुष अत्याचार ऐकून पोलिसांनाही हादरा बसला. या चिमुरडीला तिच्या आईने वेशा व्यवसाय विकले होते. मात्र तिने विरोध केला असता तिच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन अमानुष मारहाण करण्यात आलीये.

गेल्या अनेक दिवसांपासून हा कुंटणखाना चालत होता. इथल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली होती. पण पोलिसांनी लगेच कोणतीही कारवाई केली. पोलिसांनी लगेच छापा टाकून कारवाई केली असती तर चिमुरडीचीया नरक यातनेतून सुटका झाली असती. या मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close