‘तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत’, सेहवागकडून जवानांना ‘हॅपी दिवाळी’

October 25, 2016 8:17 PM0 commentsViews:

viru_army25 ऑक्टोबर : दिवाळी सणाचा उत्साह सगळीकडे ओसांडून वाहतोय. पण सीमेवर अहोरात्र खडा पहारा देणार जवान या सणाला मुकतो. खिलाडी अक्षयकुमार पाठोपाठ आता भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत हॅपी दिवाळी अशा शुभेच्छा देऊन विरेंद्र सेहवागने एक आदर्श दिलाय.

या दिवाळीत जवानांना विसरू नका असं भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यानिमित्ताने #Sandesh2Soldiers या हॅशटॅगसोबत mygov.in वर जवानांना संदेश देण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आलीये. आज सकाळी अभिनेता अक्षयकुमारने एक व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करून जवानांना शुभेच्छा दिल्यात. त्यापाठोपाठ विरेंद्र सेहवागनेही यात सहभाग घेतलाय. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, हॅपी दिवाळी अशा शुभेच्छा जवानांना दिल्यात. तसंच देशभरात जिथे कुठे जवान तुम्हाला दिसतील त्यांना एक सॅल्युट करा असं आवाहनही त्याने तमाम भारतीयांना केलं.

जवानांना एक सॅल्युट कराच – सेहवाग

तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत -अक्षयकुमार

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close