आता यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली फुटीरवाद्यांशी ‘सदिच्छा’ चर्चा

October 25, 2016 8:38 PM0 commentsViews:

yashvant_sinha25 ऑक्टोबर : काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारचं एक शिष्टमंडळ काश्मीरमधल्या फुटीरवाद्यांशी चर्चा करतंय. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ काश्मीरमध्ये गेलंय. या मंडळाला सदिच्छा शिष्टमंडळ असं नाव देण्यात आलंय.

भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबिबुल्ला, माजी हवाई दल उपप्रमुख कपिल काक, वरिष्ठ पत्रकार भारत भूषण आणि सुशोभा अर्वे यांचा या समितीत समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधली अशांतता मिटवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण त्याला अपयश आल्यानंतर आता पुन्हा एकदा फुटीरवाद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होतोय. या सदिच्छा समितीच्या सदस्यांनी सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईझ उमर फारुख या फुटीरवादी नेत्यांची भेट घेतली. काश्मीरबद्दल फुटीरवाद्यांशी काही वाटाघाटी होऊ शकतात का याबद्दल या दौ-यात चाचपणी होतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close