सचिनवरील पुस्तकाला उदंड प्रतिसाद

April 28, 2010 12:40 PM0 commentsViews: 9

28 एप्रिल

क्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही आघाडीवर आहे.

सचिनवर लिहिल्या गेलेल्या ' इफ क्रिकेट इज रिलीजन सचिन इज गॉड ' या पुस्तकालाही असाच तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. विजय सन्तानम आणि श्याम बालसुब्रमन्यम यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन भारताचे माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वेंगसरकर यांनी सचिन सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या पुस्तकात सचिनच्या 20 वर्षांतील यशस्वी कारकिर्दीचा आलेख मांडण्यात आला आहे.

close