ब्रेट ली वर्ल्ड कपमध्ये नाही

April 28, 2010 12:45 PM0 commentsViews:

28 एप्रिल

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसला आहे. टीमचा महत्त्वाचा फास्ट बॉलर ब्रेट ली ह्याला झालेल्या दुखापतीमुळे तो हा वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. स्नायंूया दुखापतीमुळे ब्रेट लीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

लीच्या हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरपासून तो ऑस्ट्रेलिया टीमसाठी खेळत नाही. पण आता नव्याने झालेल्या दुखापतीचा मोठा फटका ब्रेट लीला बसला आहे.

33 वर्षीय लीने फेब्रुवारीमध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लीच्या जागी डग बॉलिंगर किंवा रायन हॅरिस या दोघांपैकी एकाची निवड केली जाऊ शकेल.

30 एप्रिलपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरूवात होत आहे.

close