स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री इमानदार अधिकाऱ्याच्या पाठीशी उभं राहतील का ?

October 25, 2016 10:05 PM0 commentsViews:

विनय म्हात्रे, नवी मुंबई 25 ऑक्टोबर : नवी मुंबईत अखेर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातला अविश्वास ठराव मंजूर झालाय. शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन मुंढेंना हटवलंय. पण आता कसोटी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची.

सभागृहात दिसणारा गोंधळ नवीन नाहीत. ती कधी विधानसभेत दिसतात, कधी लोकसभेत तर कधी असे एखाद्या पालिकेत. कारणंही वेगवेगळी असतात. पण इमानदार अधिका-याच्याविरोधातही लोकप्रतिनिधी असे एकत्र दिसले तर काय म्हणणार? एकमेकांना कायम पाण्यात पहाणारे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे सगळे एकत्र आले आणि त्यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना हटवलंय.

tukaram_mundhe_cmतुकाराम मुंढेंनी नवी मुंबईतली अतिक्रमनं हटवली यात वाद नाही. मोकळा श्वास शहर कसं घेऊ शकतं हे मुंढेंनीच नवी मुंबईला दाखवलं. यात फेरीवाल्यांचे नगरसेवकांचे, इतर राजकीय नेत्यांचे हप्तेही बंद झाले. दुखावलेल्या ह्या नेत्यांनी आजच्या शेवटच्यादिवशीही पालिकेबाहेर मुंढेंवर शाब्दिक वार केले.

मुंढेंच्या बाजूनं नवी मुंबईतले काही मध्यमवर्गीय मात्र उभे राहिले. पण त्यांचा आवाज तसा दबलेलाच राहिला. पण आता कसोटी आहे ती मुख्यमंत्र्यांचीही. कारण पालिकेनं जरी अविश्वास ठराव मंजूर केला तरीसुद्धा तो ठराव स्वीकारायचा की फेटाळायचा याचा अंतिम अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मांडवलीच्या आरोपानं घेरलेले मुख्यमंत्री एका इमानदार अधिका-याच्या पाठीशी राहणार का?

मुंढेंच्याविरोधात अविश्वास ठराव येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याअगोदर नागपूर जिल्हा परिषदेतूनही त्यांची अशीच पाठवणी करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींना कसलीच किंमत न देणं हेही चुकीचंच आहे. पण इमानदार अधिकारी राहीलेच नाही तर लोकांची तरी कामं कशी होणार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close