नयन खानोलकर यांच्या फोटोला ‘बीबीसी’चा पुरस्कार

October 25, 2016 11:42 PM0 commentsViews:

 Nayan leopard25 ऑक्टोबर : मुंबईमधले वन्यजीव संशोधक नयन खानोलकर यांच्या बिबट्याच्या फोटोला बीबीसीच्या वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळालाय. मुंबईच्या आरे मिल्क कॉलनीत काढलेला हा बिबट्याचा फोटो आहे.

अर्बन वाईल्डलाइफ या श्रेणीत या फोटोने हा पुरस्कार पटकावला. नयन खानोलकर यांनी आपल्या सहका-यांसह आरे कॉलनीतल्या बिबट्यांचं सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प सुरू केलाय. अर्बन लेपर्ड्स या प्रकल्पाअंतर्गत गेली 7 वर्षं ते आरे कॉलनीमधल्या बिबट्यांचं सर्वेक्षण करतायत. कॅमेरा ट्रॅप पद्धतीने त्यांनी बिबट्यांचे फोटो काढलेत.

Nayan leopard 1बिबट्यांच्या येण्याजाण्याच्या वाटांवर त्यांनी कॅमेरा ट्रॅप लावले आणि अशाच एका ठिकाणी आरो कॉलनीतल्या एका घराजवळ हा बिबट्या कॅमे-यात चित्रित झाला.मुंबईमध्ये बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी नयन खानोलकर यांची संस्था काम करतेय. 2013 नंतर संजय गांधी नॅशनल पार्क आणि आरे कॉलनीच्या भागात बिबट्याचा एकही हल्ला झालेली नाही हेही नयन खानोलकर यांनी आवर्जून सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close