पेंग्विन मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोस्टरबाजी

October 26, 2016 9:41 AM0 commentsViews:

Penguine Poster

26 ऑक्टोबर :  मुंबईत राणीबागेतील पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर आदित्य ठाकरेंवर होणारी अप्रत्यक्ष टीका काही थांबायचं नाव घेत नाहीय.  मनसे आणि काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काल मातोश्रीसह मुंबईच्या विविध भागात होर्डिंग लावले होते. मात्र, होर्डिंग लावल्याची बातमी शिवसेनेला समजताच रातोरात ही होर्डिंग्ज फाडून टाकत हटवण्यात आली आहेत.

Penguine Poster1

मातोश्रीसोबतच शिवसेना भवन, राणीबाग, मंत्रालय आणि वरळी सी लिंक अशा ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे होर्डिंग लावले होते. या होर्डिंग्जवर युवराज मला मुंबईत आणू नका असं म्हणत रडणारा पेंग्विन दाखवण्यात आला आहे. या होर्डिंग्जद्वारे अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांना पेंग्विनच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात आलं आहे.

Penguine Poster2

दरम्यान, पेंग्विनच्या मृत्युमागे प्रशासनाचा निष्काळजीपणा हे कारण चुकीचे असल्याचं सांगत, महापौरांनी केली प्रशासनाची पाठराखण केली आहे. तसेच सविस्तर अहवालाशिवायच विरोधकांनी आरोप सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close