मराठवाड्यातील 4 धरणे कोरडी

April 28, 2010 12:56 PM0 commentsViews: 16

28 एप्रिल

मराठवाड्यातील धरणे आणि तलावातील पाणीसाठा आटू लागला आहे. आत्तापर्यंत चार मोठी धरणे कोरडी पडली आहेत. तर मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

त्यामुळे मरावाड्यासमोर भीषण पाणीसंकट उभे ठाकले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हयांत सध्या 590 गावांना 593 टँकर्संनी पाणी पुरवठा केला जातो.

सगळ्यात मोठी पाणीटंचाई खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नांदेड जिल्ह्यातच आहे. मराठवाड्यातील 57 मोठया प्रकल्पांत 12 टक्के तर 499 मध्यम आणि छोट्या प्रकल्पांत सरासरी 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

त्यामुळे टँकर्सच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठीही नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

close