सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

October 26, 2016 2:10 PM0 commentsViews:

salmankhan-shera759

26 ऑक्टोबर : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्याविरोधात हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरीमधल्या गुलमोहर रोडवरील हुक्का पार्लरमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने वेटरला गंभीर मारहाण केली. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर अंधेरीतील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून शेराला अटक करण्याची शक्यता आहे. शेरा हा गेल्या अनेक वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे. शेराची स्वतःची सिक्युरिटी कंपनी असून, तो सेलिब्रेटींना सुरक्षा पुरवतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close