‘काबील’चं ट्रेलर आदल्या दिवशी लीक

October 26, 2016 5:03 PM0 commentsViews:

 26ऑक्टोबर: हृतिक रोशनच्या बहुचर्चित काबील सिनेमाचं ट्रेलर काल रात्री लाँच झालं. पण खरं तर ते ट्रेलर आज लाँच करायचा प्लॅन होता. पण आदल्याच दिवशी सोशल मीडियावर वायरल झालेलं ट्रेलर पाहून निर्माता राकेश रोशनला धक्काच बसला.

यावर संताप व्यक्त करत राकेश रोशन म्हणाला की, ‘काबीलचा ट्रेलर सोशल मीडियावर आदल्याच दिवशी आलेला पाहून मला धक्का बसलाय.कुणीतरी नक्कीच ही चोरी केलीय. किंवा तो हॅक झालाय. असं करून कुणाला काय मिळालं कोण जाणे?सिनेमा रिलीज होईपर्यंत आम्हाला आता जास्त सावध राहायला हवं.’

दरम्यान हृतिकनंही तो ट्रेलर ट्विट केलाय. 26 जानेवारी 2017ला सिनेमा रिलीज होतोय. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या जुळलेल्या केमिस्ट्रीची चर्चा सध्या सुरू आहे. या सिनेमात दोघंही अंध व्यक्तीची भूमिका साकारतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा