नगरपालिकेच्या आखाड्यात स्थानिक स्थारावर आघाडी करणार -तटकरे

October 26, 2016 4:50 PM0 commentsViews:

sunil-tatkare126 ऑक्टोबर : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी स्थानिक स्तरावर आघाडी करणार असल्याचं काँग्रेस राष्ट्रवादीनं जाहीर केलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत घोषणा केलीये.

या निवडणुकीत राज्यातील चित्र स्पष्ट होणार असून राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. विधान परिषदेसाठी ज्या जागा राष्ट्रवादीकडे आहेत त्या राष्ट्रवादीलाच मिळाव्यात अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडलीये. तसंच 4-1 चा फाॅर्म्युला काँग्रेससमोर ठेवला आहे.

राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा आणि 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.  चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 आणि 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठीदेखील याच दिवशी मतदान होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close