पिंपरी-चिंचवडमध्ये 43 नगरसेवकांवर गुन्हे

April 28, 2010 1:01 PM0 commentsViews: 24

28 एप्रिल

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 43 नगरसेवकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचे काम अनेक राजकीय नेते करताना दिसतात.

यासंबंधी रामभाऊ उबाळे यांनी माहितीच्या अधिकाराखाली महापालिकेच्या नगरसेवकांरील गुन्ह्याच्या नोंदीबद्दल माहिती मागितली.

त्यातून तब्बल 43 नगरसेवकांवर विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे सिद्ध झाले. या 43 पैकी तब्बल 35 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

close