नागपूर पोलीस ठाणं बनलं हायटेक

October 17, 2008 1:34 PM0 commentsViews: 5

17 ऑक्टोबर, दिल्लीजनतेच्या मनात आपली प्रतिमा चांगली राहावी, यासाठी पोलिसांकडून नेहमीच प्रयत्न होताना दिसतात. नागपूर पोलिसांनी असाच प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवेद्वारे पोलीस आणि जनता यांच्यासाठी जनसंवाद नावाची योजना राबवण्यात आली. पोलिसांनी राबवलेली ही पहिलीच योजना आहे. नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना जिल्हा पोलीस अधीक्षकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जनसंवाद सुरू केला होता. यामुळं गावातली कुठलीही व्यक्ती थेट तक्रार करू शकत होती. या योजनेमुळं जनतेचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होऊ लागलीय. ही योजना पंतप्रधान पुरस्कारासाठी नामांकित झाली आहे. ग्रामीण भागातल्या 15 पोलीस स्टेशनवर अशाप्रकारचे वेबकॅम लावण्यात आले आहेत. लोक थेट एसपींशी संपर्क साधू लागल्यानं ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. नागपूर पोलिसांनी राबवलेल्या या अनोख्या योजनेची दखल हॉवर्ड युनिव्हर्सिटीनंही घेतली आहे. यावर्षीच्या पंतप्रधान पुरस्कारासाठी याची निवड झाल्यानं महाराष्ट्र पोलिसांसाठी ही गौरवास्पद बाब आहे.

close