मेट्रो रेल्वेची 15 ऑगस्टला ट्रायल

April 28, 2010 2:25 PM0 commentsViews: 8

28 एप्रिल

वाहतुकीवरील ताण कमी करणारी मेट्रो रेल्वे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. मेट्रोचे चार डबे काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत.

पुढच्या वर्षभरात मेट्रो आणि मोनो रेल्वे दोन्ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील एक ट्रेन चार डब्यांची असेल.

दिवसभरात साधारण दीड ते दोन हजार प्रवासी यातून प्रवास करु शकतील. या मेट्रो रेलची 15 ऑगस्टला ट्रायल घेतली जाणार आहे.

close