अविश्वासदर्शक ठराव फेटाळणार, मुंढेंना मुख्यमंत्र्यांचं अभय

October 26, 2016 7:17 PM0 commentsViews:

tukaram_mundhe_cm26 ऑक्टोबर : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरचा अविश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री फेटाळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. नवी मुंबईचे आयुक्त तुकारम मुंढे यांनी मंत्रालायात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांची भेट घेतली.

नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेने मिळून सभागृहात आणलेला अविश्वासदर्शक ठराव काल मंजूर झाला. 105 विरुद्ध 6 मतांनी हा ठराव आज मंजूर करण्यात आलाय. या ठरावानंतर आज तुकाराम मुंढे यांनी मंत्रालय गाठले. तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रविण परदेशींची भेट घेतली। परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आहे. मुंढे यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली बाजू मांडली. तसंच कामकाजाचा अहवालही सादर केला. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेचा अविश्वास प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री फेटाळणार आहे. राज्य सरकार प्रामाणिक अधिका•यांच्या पाठीशी आहे, असा संदेश मुख्यमंत्र्यांना यातून द्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय अजून दिलेला नाही. मात्र, लवकरच याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close