शाहू दूध बाजारात दाखल

April 28, 2010 2:31 PM0 commentsViews: 6

28 एप्रिल

बाजारात आणखी एक दुधाचा नवा ब्रॅन्ड दाखल झाला आहे.

देशात साखर कारखान्यात अग्रगण्य असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी हा ब्रॅन्ड आणला आहे.

श्री छत्रपती शाहू मिल्क ऍन्ड ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यातून हे शाहू दूध बाजारात आले आहे.

या दुधाचे वितरण आज कोल्हापुरात करण्यात आले.

येत्या काही दिवसात कंपनी सांगली, सातारा, पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत उतरणार आहे.

close