‘माही’च्या रांचीत भारताचा पराभव

October 26, 2016 10:15 PM0 commentsViews:

ranchi_dhoni426 ऑक्टोबर : अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा 19 रन्सने पराभव केलाय. या विजयासह न्यूझीलंडने 2-2 ने बरोबरी साधली आहे. 260 रन्सचा पाठलाग करणारी टीम इंडिया 241 रन्सवर गारद झाली. कॅप्टन कूल धोणीची जन्मभूमी असलेल्या रांचीच्या मैदानावर पहिल्यांदाच भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.

रांची येथे चौथ्या वनडेत न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करत 260 रन्स केले. भारताला विजयासाठी 261 रन्सचे टार्गेट दिले. 261 रन्सचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा अवघ्या 11 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रहाणेनं टीम इंडियाची स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न केला. विराटने 45 रन्स तर अजिंक्य रहाणेनं हाफ सेंचुरी झळकावली. विशेष म्हणजे कॅप्टन कुल धोणीच्या जन्मभूमी रांचीमध्ये धोणीची जादू चालली नाही. 11 रन्सवरच धोणी आऊट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक खेळाडू आऊट झाले. 48.3 ओव्हरमध्ये 241 रन्सवर टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला. या विजयासह न्यूझीलंडने वनडे सिरीजमध्ये 2-2 ने बरोबरी साधलीये. आता 29 ऑक्टोबरला विशाखपट्टणममध्ये खेळवण्यात येणा•या मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी करो या मरोची परिस्थिती असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close