परमात्मा सहकारी बँकेचा परवाना रद्द

April 28, 2010 2:36 PM0 commentsViews: 1

28 एप्रिल

नागपूरमधील महिला आणि समता बँक बुडाल्यानंतर आता शहरातील परमात्मा सहकारी बँकेचा परवाना रद्द झाला आहे.

यामुळे बँकेतील गुतंवणूक दारांनी बँकेच्या गणेशपेठ मुख्य शाखेत गर्दी केली होती.

या बँकेत 58 हजार ठेवीदार आहेत. बँकेत 62 कोटींच्या ठेवी आहेत.

11 नोव्हेंबर 2008 ला रिझर्व बँकेने परमात्मा बँकेवर निर्बंध घातले होते. विदर्भात बँकेच्या 11 शाखा आहेत.

विदर्भातील महत्वाच्या तीन बँक बुडल्याने सहकार क्षेत्रात घबराट पसरली आहे

close