अक्षयकुमार यवतमाळमधलं शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव घेणार दत्तक

October 27, 2016 9:56 AM0 commentsViews:

Akshay meet Mungantiwar

27 ऑक्टोबर : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षयकुमार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात काल (बुधवारी) याबाबत बैठक झाली.

ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांची मदत करण्याची इच्छा अभयने मुनगंटीवारांकडे व्यक्त केली. तेव्हा मुनगंटीवारांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याबाबत सुचवलं. या गावात रोजगार निर्मिती आणि प्राथमिक गरजांसाठी तो मदत करणार आहे.

ज्या गावात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या त्या गावांचा अभ्यास करुन सरकार प्रस्ताव देणार आहे. यापूर्वीही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांना अक्षयने मदतीचा हात दिला आहे. अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी 90 लाखांची मदत जाहीर केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा