पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, BSF जवान शहीद

October 27, 2016 1:16 PM0 commentsViews:

LOC new27 ऑक्टोबर : बीएसएफच्या चोख प्रत्युत्तरानंतरही जम्मूतील नियंत्रण रेषेजवळील आरएस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार करण्यात आला. तसंच सकाळी मोर्टारही डागण्यात आल्या. यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. तसंच 6 जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 6 जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा