‘ऐ दिल है मुश्किल’ VS ‘शिवाय’, बॉक्स ऑफिसवर आज चुरस

October 28, 2016 8:59 AM0 commentsViews:

movies_Filmstill_27102016

28 ऑक्टोबर: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर चांगलेच फटाके वाजणार आहेत. दोन मोठे सिनेमे दिवाळीत रिलीज झाला आहे. ऐ दिल है मुश्किल आणि शिवाय. स्पर्धा तर आहेच. करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल हा रोमँटिक आहे, तर अजय देवगणचा शिवाय हा ॲक्शन थ्रिलर आहे. कोण वरचढ ठरणार हे वीकेण्डला कळेलच.

करण जोहरचा सिनेमा जास्तीत जास्त मल्टिप्लेक्समध्ये रिलीज झाला तर ‘शिवाय’ हा सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये रिलीज झाला. दोन्ही सिनेमे 2800 ते 3000 स्क्रीन्सवर रिलीज झालाये. म्हणजे दोघांनाही मिळणाऱ्या स्क्रीन्सची संख्या सारखीच आहे.

ऐ दिल है मुश्किलचं बजेट जवळजवळ 70 कोटींचं. आणि प्रमोशनला खर्च केलेत 10 ते 15 कोटी रुपये. सिनेमा रिलीज होण्याआधी त्याचे काही राइट्स विकले जातात. तसे ऐ दिल है मुश्किलचे राइट्स विकून आधीच 50 कोटी रुपये मिळालेत.शिवाय सिनेमाही जवळजवळ 105 कोटींमध्ये बनलाय. प्रमोशनसाठी 20 कोटी खर्च झालेत. शिवायलाही रिलीज आधी राइट्सवर 50 कोटी मिळालेत.

करण जोहरनं सेलिब्रिटींसाठी सिनेमाचे शोज ठेवलेत. बॉलिवूड सेलिब्रिटीज ऐ दिल है मुश्किलचं तोंडभरून कौतुक करतायत. सिनेमांची स्पर्धा तर रंगणार असं दिसतंय. ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. प्रेक्षकांचा कौल कुणाला हे कळेलच.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


>>

close