एसटीसाठी विद्यार्थ्यांनी रस्ताच बांधला

October 27, 2016 5:24 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर : गावाचा रस्ता खराब असल्याने एसटी बस येत नाही म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रस्त्याचं काम केलं आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी काही कॉलेजचे नसून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आहेत.

मागील पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणातहानी झाली. रस्ता खराब झाल्याने बार्शी एसटी आगर ने गावाची एसटी बंद केली. गेल्या अनेक महिन्यापासून या गावातील एसटी बंद असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जायचं असेल पायी जावं लागतं. शाळेत जाताना सुद्धा गावातील मुली,मुल एकत्र जातात. एकजरी विद्यार्थी आजारी असेल तर ते शाळेत जात नाहीत. यावर उपाय म्हणून त्यांनी वारंवार बार्शी एसटी आगरला तक्रार दिली मात्र रस्ता खराबच कारण सांगून एसटी चालू केली नाही. यावर उपाय म्हणून हे छोटे छोटे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच काम हात घेतलं. त्यांना अशा आहे की हे खडे बुजवल्यावर तरी एसटी चालू होईल.barshi3

रस्ता खराब असल्याने बार्शी एसटी आगर ने 3 गावाच्या एसटी बसेस बंद केल्या आहेत. या विद्यार्थ्यांची तक्रारही एसटीच्या प्रशासनासमोर गेली आहे. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांनी एसटी बंद असल्याचे त्यांनी सांगितलं.

ही मागणी फक्त बार्शी तालुक्यातील नसून राज्यातील अनेक गावाची आहे. गाव तिथ एसटी हे शासनच धोरण असाल तरी याच शासनातील रस्ते विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close