बिग बजेट सिनेमांची बिग कमाई

October 27, 2016 5:36 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर: सिनेमांची बजेट्स दिवसेंदिवस वाढतच आहेत. जेवढा खर्च होतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कमाई होते. असे अनेक बिग बजेट सिनेमे आतापर्यंत येऊन गेलेत. टाकू या एक नजर

बाहुबली- या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर कमाई केली. पण हा सिनेमा बनवण्यासाठी खर्च आला 250 कोटी रुपये. सिनेमाची कमाई झाली 545 कोटी रुपये.

रोबोट- रजनीकांतचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही तरच नवल. सिनेमातली ऐश्वर्या-रजनीकांत जोडी प्रेक्षकांना आवडली होती. सिनेमा बनला होता 150 कोटींमध्ये. सिनेमानं कमाई केली 300 कोटी रुपये.

बँग बँग – या सिनेमाचं बजेट होतं 140 कोटी रुपये. सिनेमानं कमाई केली 340 कोटी रुपये. हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांची जोडी हिट ठरली होती.

रा वन -शाहरूख खान-कतरिनाच्या या सिनेमावर टीकाही बरीच झाली होती. सिनेमाचं बजेटही खूप होतं. 135 कोटी. पण सिनेमानं कमाई केली 160 कोटी रुपये.

किक- सलमान खानच्या किकचं बजेट होतं 115 कोटी रुपये. सलमानचा कुठलाही सिनेमा सुपरडुपर हिट होतोच. या सिनेमानं कमावले 400 कोटी.

क्रिश 3 – हृतिक रोशन आणि कंगना राणावतचा क्रिश 3 सिनेमा बनला होता 115 कोटींना. आणि सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली 245 कोटी रुपये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close