नगरपरिषदेच्या आखाड्यात सेना-भाजपची युती ?

October 27, 2016 10:09 AM0 commentsViews:

uddhav and fadanvis_new27 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपचं पुन्हा तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना अशी अवस्था झालीये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये पुन्हा युतीसाठी हालचालींना वेग आलाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचं कळतंय. तसंच शिवसेना खासदार विनायक राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठकही झाली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधून स्वबळाची नारेबाजी झाली. उद्धव ठाकरे यांनीही युती तोडून दाखवाच असा इशाराही दिलाय. मात्र, निवडणुकीत याआधीच स्वबळावर लढण्याचा दोन्ही पक्षांना चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे तुझ्या माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना अशी अवस्था दोन्ही पक्षांची झालीये. दोन्ही नेत्यांनी आपला विरोध बाजूला ठेवून युतीसाठी पुढे सरसावले आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठकही झाली. या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली. नगरपंचायत,नगपरिषद निवडणूकांमध्ये भाजप- सेनेत युती करण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात दोन्ही पक्षाकडून संयुक्त प्रसिद्धी पत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close