देशाच्या जवानांची किंमत 5 कोटी आहे का?, अजित पवारांचा सवाल

October 27, 2016 7:57 PM0 commentsViews:

ajit_dada_raj_cm

 27 ऑक्टोबर : ‘ऐ दिल है मुश्किल’च्या रिलीजसाठी पाच कोटी वेलफेअर फंडाला देण्यास सांगितलं म्हणजे तुम्ही पाच कोटीत तोडपाणी करता? आमच्या जवानांची, देशाची किंमत पाच कोटी रुपये इतकी केली का? असा सवाल अजित पवारांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाय. ते आज मोहोळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या वादावर पडदा पडल्यानंतर अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. वास्तविक पाहता पाच कोटीत तोडपाणी करणे अयोग्य असून देशाची, जवानांची किंमत पाच कोटी करताय का? मुख्यमंत्र्यांनी याला ठामपणे नकार द्यायला हवा होता. मात्र त्यांनी तसे केले नसल्याने अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. याआधीही अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close