लोडशेडिंग वाढणार…

April 28, 2010 6:28 PM0 commentsViews: 78

28 एप्रिल

चंद्रपूर पाठोपाठ आता कोयना धरणातील पाण्याचा साठाही कमी झाल्याने राज्यापुढे वीज निर्मितीचे संकट उभे राहिले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक लवादानुसार महाराष्ट्राला वीजनिर्मितीसाठी कोयनेतून वर्षभरात फक्त 67.5 टी एमसी पाणी वापरता येऊ शकते.

यापैकी 65.7 टक्के पाण्याचा वापर झाला आहे. शिल्लक 1.8 टीएमसी पाण्यावर मागणी प्रमाणे वीजनिर्मिती करता येणार नाही.

यामुळे कोयनेच्या चार वीजनिर्मिती युनिटपैकी दोन युनिट बंद पडण्याची शक्यता आहे.

परिणामी भारनियमनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोयनेतून सध्या 1900 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.

वीजटंचाईवर एक नजर टाकूयात…

राज्याची आजची विजेची मागणी – 14,011 मेगावॅट

सध्या उपलब्ध असलेली वीज – 10, 627 मेगावॅट

एकूण तूट – 3,384 मेगावॅट

औष्णिक प्रकल्पातील वीजनिमिर्ती – 4, 202 मेगावॅट

चंद्रपूर प्रकल्पाची एकूण क्षमता – 2, 340 मेगावॅट

5 संच बंद असल्याने होणारी वीजनिमिर्ती – 300 मेगावॅट

दाभोळ गॅस ऊर्जा प्रकल्प क्षमता – 1, 940 मेगावॅट

सध्या होणारी वीजनिमिर्ती – 1, 500 मेगावॅट

उरण गॅसऊर्जा प्रकल्प क्षमता – 852 मेगावॅट

सध्या होणारी वीजनिमिर्ती – 655मेगावॅट

औष्णीक वीज प्रकल्पातून क्षमतेपेक्षा कमी वीजनिर्मिती होत असल्याने त्याचा भार कोयना जलविद्युत प्रकल्पावर पडतो.

कोयना जलविद्युत प्रकल्प क्षमता – 1, 960 मेगावॅट

सध्या होणारी वीजनिमिर्ती – 1, 980 मेगावॅट

वीजनिमिर्ती कमी झाल्याने राज्यावरचे लोडशेडिंग वाढत जाणार आहे.

सध्या ग्रामीण भागात 13 ते 15 तास लोडशेडिंग

इतर भागात 4 ते 8 तास लोडशेडिंग

close