पाकचा हेकेखोरपणा, भारतीय अधिकाऱ्याला पाक सोडण्यास सांगितले

October 27, 2016 11:50 PM0 commentsViews:

india pak 3327 ऑक्टोबर : दिल्ली येथील पाकिस्तानच्या उचायुक्तामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली मेहमद अख्तर या अधिका-याला देश सोडून जाण्यास सांगितलंय. पण पाकिस्तानने आपला हेकेखोरपण दाखवत भारतीय उच्चायुक्तांना भारतात पाठवले आहे.

पाकिस्तानच्या उचायुक्तामध्ये अख्तरकडून संरक्षणविषयक महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. त्याच्यासोबत दोन भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आलीये. त्याला तात्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. पण, पाक परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी सुरजीत सिंह यांना पाकिस्तान सोडून जाण्यास बजावलंय. भारताला प्रत्युतर देण्यासाठी पाकने ही कारवाई केली, सुरजीत सिंह आणि त्यांच्या कुंटुबियाला 24 तासात पाकिस्तान सोडून जाण्याची नोटीस देण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close