औरंगाबादवर सेनेचा भगवा

April 29, 2010 9:33 AM0 commentsViews: 6

29 एप्रिल

अखेर शिवसेनेने औरंगाबादचा गड राखला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदी आज शिवसेनेच्या अनिता घोडेले निवडून आल्या. तर उपमहापौरपदी भाजपचे प्रशांत देसरडा निवडले गेले.

घोडेले यांनी काँग्रेस आघाडीच्या रेखा जैस्वालवर यांच्यावर मात केली. महापौरपदासाठी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. पण सेनेच्या चंद्रकांत खैरेंना गड राखण्यात यश मिळवले.

घोडेलेंना 51 तर जैस्वालांना 47 मते पडली. तर मनसे या मतदानात तटस्थ राहिली.

उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत देसरडा विजयी झाले. त्यांना 51 मते पडली. त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेख ख्वाजा शरफुद्दिन यांचा पराभव केला.

शेख यांना 47 मते पडली. त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही काँग्रेस आघाडीच्या पदरी निराशाच आली.

close