मुंबईत उडत्या दिव्यांच्या कंदिलांवर बंदी

October 28, 2016 12:24 PM0 commentsViews:

Chinese-Lantern

28 ऑक्टोबर : दिवाळीत उडत्या दिव्यांच्या कंदिलांवर बंदी घालण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे, असं पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितलं आहे.

दिवाळीच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात हे उडते कंदिल हवेत सोडले जातात. हे कंदिल कोणत्याही परिसरात पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. तसंच दहशतवादीदेखील या लँटर्नचा वापर करण्याची भीती असल्याने या कंदिलांवर बंदी आणावी, अशी मागणी मुंबई अग्निशमन दलाने पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत पेटते कंदील उडवता येणार नाही.

तसंच अशा प्रकारच्या कंदील विक्री करणार्‍यांवर, उडविणार्‍या आणि विक्री साठा करण्यार्‍यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close