निर्मात्यांना कृष्णकुंजवर जायचे नव्हते म्हणून वर्षावर बैठक -मुख्यमंत्री

October 28, 2016 3:20 PM1 commentViews:

 

28 ऑक्टोबर : ‘ऐ दिल है मुश्किल’साठी मध्यस्थी केल्याने विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी या वादावर मौन सोडले आहे. नेटवर्क 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू रोखठोकपणे मांडली.

CM Fadnavis

हे राज्य कायद्याचं आहे. निर्मात्यांना कृष्णकुंजवर जायचं नव्हतं. म्हणून मी त्यांना वर्षावर बोलावलं, आणि शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर, शबाना आझमी आणि अशोक पंडित सारख्यांना हेच पटत नाहीये. मला प्रश्न करणारे ते कोण आहेत, अशा आक्रमकपणे फडणवीसांनी स्वतःचा बचाव केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vinit Gavankar

    Manaje varsha banala settlement chi jaga ahe ka :)

close