सोरेन यांच्या मुलाचा पुढाकार

April 29, 2010 10:04 AM0 commentsViews: 2

29 एप्रिल

झारखंडच्या अस्थिरतेने आता एक नवीन वळण घेतले आहे. भाजपने सरकारचा पाठिंबा काढू नये, शिबू सोरेन यांच्याऐवजी मी मुख्यमंत्री होईन, असा नवा फॉर्म्युला शिबू सोरेन यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी मांडला आहे.

या नव्या प्रस्तावावर आता भाजपमध्ये विचार सुरू आहे. भाजपच्या झारखंडमधील काही नेत्यांनीसुद्धा निवडणुका टाळण्यासाठी पाठिंबा काढण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी वरिष्ठ नेत्यांना विनंती केल्याची माहिती आहे. भाजप आता यावर काय निर्णय घेते याबद्दल उत्सुकता आहे.

झारखंडमध्ये सरकार स्थापन करायचे का, यावर विचार करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होत आहे. तर पक्षाच्या सर्व आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. या आमदारांशी बोलल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे भाजपने सांगितले आहे.

close