मराठा मोर्च्याची दिल्लीकडे कूच !

October 28, 2016 4:52 PM0 commentsViews:

nagar_maratha28 ऑक्टोबर : राज्यभरात मराठा क्रांती मोर्च्याचे वादळ आता दिल्लीतही धडकणार आहे. पुढील महिन्यात 20 नोव्हेंबरला दिल्लीत मराठा क्रांती मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी घोषणा मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजन समितीने केलीये.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यासाठी राज्यभरात मराठा मोर्चे निघाले. औरंगाबादपासून सुरू झालेल्या या मोर्च्यांनी आता राज्यासह सीमाभागही व्यापला आहे. ठिकठिकाणी मूकमोर्चे काढून मराठा समाजाने मोर्च्याची दखल घेण्यास भाग पाडले. आता मराठ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. 20 नोव्हेंबरला जंतरमंतर ते महाराष्ट्र सदनापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चेकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची घेणार आहे. 40 ते 50 हजार मोर्चेकरी या मोर्चेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगीही दिलीेय. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात केंद्र सरकारचे हिवाळी अधिवेशनही सुरू होणारच याच दरम्यान हा मोर्चा काढण्यात येतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close