अशी तयार होते पाणी पुरी, पाहणार तर खाणं सोडणार !

October 28, 2016 5:57 PM0 commentsViews:

pani_puri (3)कल्याण, 28 ऑक्टोबर : पाणी पुरी म्हटलं तर चटकण तोंडाला पाणी सुटते. गोड आणि तिखट पाण्यासोबत पाणीपुरीची लज्जत काही औरच असते. पण, तुम्ही तुमच्या लाडक्या पाणी पुरीची तयार होण्याची प्रक्रिया पाहिली तर तुम्ही पाणी पुरी खाणं नक्की सोडणार. कारण, कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातील पाणी पुरी बनवण्याच्या कारखान्यात पुरीसाठी पीठ अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बनवण्यात येते. चार ते पाच मुले या पिठावर नाचत हे पीठ मळत असताना दिसून आले आहे.

pani_puri (1)सगळ्यांचा आवडता खाद्य पदार्थ म्हणजे पाणी पुरी,शेव पुरी भेळपुरी. खिशाला परवडणारी,चटपटीत चवीने मुले हे खाद्य पदार्थ खवय्यांची पसंती ठरली आहे. शहरात प्रत्येक चौकात भेळपुरीच्या पाणी पुरी विक्रेता आढळून येतोच. हे विक्रेते स्वच्छता ठेवत असल्याचा आव आणत असले तरी प्रत्यक्षात मात्र या पदार्थात वापरण्यात येणारी पुरी बनवण्याच्या कारखान्यात पुरीचे पीठ कसे तयार केले जाते हे उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

pani_puri (2)कल्याण पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात राहणार चंदन झा हा तरुण पाणी पुरी आणण्यासाठी कर्पेवाडी परिसरात असलेल्या पुरीच्या कारखान्यात गेल्यावर त्याने पाहिलेला प्रकार धक्कादायक होता. अस्वछता असलेल्या या खोलीत चार ते पाच लहान मुले या पाणी पुरीचे पाठ मळण्यासाठी पिठावर चक्क नाचत होते. मुतारीमधून आल्यानंतर हात पाय न धुता काही मुले पिठावर नाचताना पाहून तर चंदनच्या पाया खालची जमीन सरकली. विशेष म्हणजे या कारखान्यातून जिल्हयात पुरीचा पुरवठा केला जातो. याबाबत चंदनने अशा प्रकारे नागरिकच्या जीवाशी खेळणा•यावर कारवाईची मागणी केली आहे. तर हा गोरखधंदा स्थानिक भाईं, दादाच्या आश्रयाने सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणा•या कारखाना चालकांवर काय कारवाई होणार हे पाहण्याचे ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close