न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये प्रकाशाचा उत्सव

October 28, 2016 8:58 PM0 commentsViews:

New-York-Diwali28 ऑक्टोबर : अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी दिवाळीची धूम असते. याहीवर्षी न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरमध्ये दिवाळी साजरी झाली. यावर्षी तर अमेरिकेमध्ये दिवाळीसाठी अधिकृत स्टॅम्प तयार करण्यात आलाय. त्यामुळे अमेरिकेत राहणा-या भारतीयांचा हा एक मोठा गौरव समजला जातोय.

यावर्षी न्यूयॉर्कमध्ये साज-या झालेल्या दिवाळीत आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा अशा कार्यक्रमांची रेलचेल होती. असोसिएशन्स ऑफ इंडियन्स इन अमेरिका या संघटनेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यासोबत न्यूयॉर्कची दिव्य ज्योती असोसिएशन ही संघटनाही न्यूयॉर्कच्या रिचमंड हिल्स या ठिकाणी दिवाळीचं सेलिब्रेशन आयोजित करत असते. त्यामुळे भारतीयांसोबत न्यूयॉर्कवासियांनाही प्रकाशाचा हा उत्सव अनुभवता येतो. यावर्षी 16 ऑक्टोबरला न्यूयॉर्कमध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन रंगलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close