आम्ही कर भरतो, 5 कोटी देणार नाही ; फरहानकडून ‘राजदंडा’ला केराची टोपली

October 28, 2016 9:13 PM0 commentsViews:

farhan_on raj28 ऑक्टोबर : आम्ही कर भरतो, आणि आमचं संरक्षण करणं हे सरकारचं काम आहे अशी मागणी करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि निर्मात्यांनी काढलेल्या तोडग्याला अभिनेता फरहान अख्तरनं केराची टोपली दाखवलीय.

‘ए दिल है मुश्किल’च्या रिलीजआधी करण जोहरनं 5 कोटी देण्याची घोषणा केली होती. पण मी ते देणार नाही. आम्ही कर भरतो, आणि आमचं संरक्षण करणं हे सरकारचं काम आहे, असंही त्यानं पुढं म्हटलंय. तसंच लष्कराला 5 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही, खुद्द लष्करानंच ते पैसे नाकारलेत, असं फरहान म्हणालाय. रईस या सिनेमात शाहरुख खानबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आहे. त्यामुळे रईसच्या रिलीजवेळीही आता वाद होतो का, ते पाहावं लागेल. 26 जानेवारी 2017 रोजी रईल येतोय.

फरहानची रोखठोक भूमिका
- रईसच्या रिलीजवेळी 5 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही. लष्करानंच ते पैसे घ्यायला नकार दिलाय. जी देणगी खंडणी वाटते, असे पैसे घ्यायला लष्करानं नकार देणं ही चांगलीच गोष्ट आहे. आम्ही कायदा पाळतो आणि कर भरतो. आम्ही तेवढंच करू शकतो. देशात कायद्याचं राज्य आहे. सरकारनं आमची काळजी घेतलीच पाहिजे. पैसे द्यायचे की नाही हे ‘ए दिल हे मुश्किल’च्या निर्मात्यांनी ठरवावं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close