भुजबळांची तब्येत खालावली, पुन्हा ‘जेजे’त दाखल

October 28, 2016 10:40 PM0 commentsViews:

bhujbal_arrestedमुंबई, 28 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर आर्थर रोड जेलमधून त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.

मनी लाँड्रिंग गैरव्यवहार प्रकरणी माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात कोठडीत आहे. आज भुजबळांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना पुन्हा जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. भुजबळांच्या काही चाचण्या होणार असल्याचं सांगण्यात होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्यानं जेजेमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. महिन्याभरात दुस-यांदा छगन भुजबळांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close