सेन्सेक्स 10 हजारांच्या खाली

October 17, 2008 4:23 PM0 commentsViews: 7

17 ऑक्टोबर, दिल्लीशेअर मार्केटनं आज दोन वर्षांतील निच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्स 10 हजारांच्या खाली आल्यानं अनेक गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला.जुलै 2006 साली सेन्सेक्स 10 हजाराच्या खाली होता. आज सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसली. पण ट्रेडिंगच्या अखेरीस चित्र वेगळं होतं.582 अंशांची घसरण होत सेन्सेक्स 9 हजार 998.73 अंशावर स्थिरावला. निफ्टीमध्ये 196.35 अंशांची घसरण होत ट्रे्‌डिंगच्या अखेरीस 3 हजार 72 पातळी होती. हा आठवडा शेअर बाजाराच्यादृष्टीनं फार चांगला गेला नाही. सेन्सेक्स अप राहण्यापेक्षा डाऊनच जास्त होता. आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला जास्त फटका बसला. हा शेअर सुमारे साडेसहा टक्के घसरला. टॉप गेनर्समध्ये आज एकही शेअर येऊ शकला नाही पण टॉप लूजर्समध्ये मात्र रिलायन्स इन्फ्रा, जेपी असोसिएट्स, डीएलएफ आणि एनटीपीसीचे शेअर्स दिसले.

close