रामायण ग्राफिक्स रुपातून…

October 29, 2016 12:12 AM0 commentsViews:

सध्या सगळीक़डे दिवाळीची धूम आहे,त्यामुळे ह्या सणाची खऱ्या गोष्ट आपल्याला माहीत असायलाच हवी. रामाने रावणावर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून दिवाळी साजरी केली जाते.तर ग्राफिकच्या माध्यमातून आपण ही कथा आज ऐकणार आहोत.

खूप वर्षांपूर्वी कोसला येथे राजा दशरथ त्याच्या कौशल्या,कैकेयी आणि सुमित्रा ह्या तीन राण्यांसोबत राहत होता.त्यांना राम,भरत,लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही चार मुले होती.

दुसरीकडे मिथीला राज्यात जनक राजा आणि सुनैना राणी राहत होते .एकदा त्यांना नांगरलेल्या शेतात एक बाळ सापडले,ते दत्तक घेऊन त्यांनी तिचे नाव सीता ठेवले.

राम आणि लक्ष्मण मोठे झाल्यानंतर त्यांना दशरथ राजाने विश्वमित्रांकडे गुरुकुलात युद्धविद्या शिकायला पाठविले.

काही वर्षांनंतर सीता लग्नाच्या वयात आल्यानंतर जनक राजाने स्वयंवराची घोषणा केली. त्यात इच्छुकांना सीतेशी लग्न करण्यासाठी महादेवाचे धनुष्य उचलावे लागणार होते. मात्र त्यातील कोणीही त्यायोग्य नव्हते.

रामाने मात्र ते धनुष्य फक्त उचलेच नाही तर तोडलेसुद्धा आणि अशाप्रकारे रामाने सीतेचा लग्नासाठी स्वयंवर जिंकला.

काही वर्षांनी दशरथ राजाने पुढील राज्यकारभार रामाच्या हवाली करण्याचे ठरविले मात्र त्याला राणी कैकेयीने विरोध करुन राम आणि सीतेला चौदा वर्ष वनवासाला पाठवले. दासी मंथरेची ही गोष्ट डोक्यात घेतलेल्या कैकेयीचे म्हणणे राजाला एका वचनामुळे ऐकावेच लागले.

तिला तिचा मुलगा भरत ह्याला राजगादीवर बसलेले पाहायचे होते. भरतने मात्र रामाच्या पादुका त्या गादीवर ठेवुन त्याच्या नावाने कारभार पाहिला.

वनवासात राम,सीता आणि लक्ष्मण पंचवटी अरण्यात पोहोचले. तेथे त्यांनी लंके चा राक्षसांचा राजा रावण ह्याच्या बहिणीशी वाद ओढावुन घेतला.

दोन्ही सुंदर भावांवर भाळल्यामुळे तिने सीतेला मारण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यात लक्ष्मणाने तिचे नाक कापले.

बहीणीच्या ह्या अपमानाचा बदला म्हणुन रावणाने सीतेचे अपहरण करण्याचे ठरविले आणि त्यात त्याचा मित्र मारिच राक्षसाची मदत घ्यायचे ठरविले.

त्याने सोनेरी हरणाचे रुप घेतले आणि ते फारच आवडल्याने सीतेने रामाला ते तिच्यासाठी आणण्यास सांगितले.दरम्यान, सीतेचे संरक्षण करीत असताना लक्ष्मणाला जंगलातुन रामाचा आवाज आला. मात्र बाहेर पडण्यापूर्वी त्याने सीतेच्या कुटीभोवती एक संरक्षक सीमारेषा आखली,ज्याला लक्ष्मण रेषा म्हणतात.

सीता एकटी असताना साधुचे रुप घेऊन रावण त्या कुटीजवळ आला.

त्याने सीतेकडे भिक्षेची मागणी केली

मात्र दान देण्यासाठी लक्ष्मणरेषा ओलांडताच….

रावण मुळ रुपात आला.त्याने सीतेला खेचुन आपल्या उडत्या रथात बसविले.

सीतेच्या किंचाळ्या ऐकुन आलेल्या जटायुने रावणाशी युध्द केले.

मात्र शेवटी त्याला विरोध करताना तो जखमी झाला आणि त्यांना रोखु शकला नाही.

नंतर सीतेचा शोध घेत असताना राम आणि लक्ष्मण हनुमाना भेटले.त्यांनी त्यांचा भाऊ आणि किष्किंदाचा राजा सुग्रीव ह्याची मदत घेतली.

सुग्रीवाने त्याच्या सैन्याला चार दिशांना पाठविले ,त्यापैकी अंगदाच्या निदर्शनाखाली दक्षिणेकडे गेलेले सैन्य सीतेची बातमी घेऊन आले.

ती लंकेत होती.तिच्याकडे रामाचा संदेश घेउन जायचे काम हनुुमानाला देण्यात आले.

तो सप्तसमुद्र पार करुन त्या अशोक वाटीकेत पोहोचला जेथे सीतेला ठेवण्यात आले होेते.

त्याने सीतेला रामाची अंगठी देउन विश्वासात घेतले.

त्याने लंकेत घातलेल्या धुमाकुळामुळे त्याला रावणासमोर उभे करण्यात आले.

त्याला धडा शिकवण्यासाठी रावणाने मोठी शिक्षा देण्याचे ठरविले.त्याला शेपटीला आग लावण्यात आली .मात्र हनुमानानेही तश्या शेपटीसहीत एका छतावरुन दुस•या छतावर उड्या घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान राम आपल्या फौजेसह समुद्राचा अडथळा वगळता लंकेजवळ पोहोचला होता.तो पार करण्यासाठी वानरसेनेने दगड-गोट्यांनी सेतु बांधला.

राम तेथे पोहोचल्यानंतर रावणाचा भाऊ विभिषणाने त्यांना मदत देऊ केली

तिकडे चाललेल्या मोठ्या सुध्दात लक्ष्मण जखमी होऊन कोसळला.

त्याला वाचविणारी औषधी वनस्पती संजीवनी फक्त कैलास पर्वतावर सापडे.ती आणण्यासाठी गेलेल्या हनुमानाला ती ओळखता न आल्याने त्याने संपुर्ण पर्वत उचलून आणला.अशात-हेने लक्ष्मणाचा जीव वाचला.

रामाने रावणाचा वध केल्यानंतर विभिषणाला लंकेच्या गादीवर बसविले आणि चांगल्याचा विजय झाला.

अशात-हेने राम आणि सीता एकत्र आले.

ते तिघे घरी अयोध्येला आल्यानंतर राम गादीवर बसला.

संपुर्ण राज्याने हा विजय दिवे लावून साजरा केला.तेव्हापासून दरवर्षी हा दिवस दिवाळी सण म्हणून साजरा केला जातो.

(आर्टीस्ट -प्रेरणा मित्रा आणि राज)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close