‘वजनदार’ सोनाक्षीचा अनोखा ‘नूर’

October 29, 2016 11:25 AM0 commentsViews:

Sonakshi_Sinha_GE_281016

29 ऑक्टोबर: बॉलिवूडमध्ये सोनाक्षी सिन्हा नेहमीच खात्यापित्या घरचीच वाटायची. अनेक सिनेमात तिनं काम करताना आपला स्थुलपणा नक्कीच कॅश केला. पण आता सोनाक्षी सिन्हानं आपलं वजन कमी केलंय.’नूर’ सिनेमासाठी ती स्लीम अँड ट्रीम झालीय. आणि त्यामुळे ती जास्त आकर्षक दिसतेय.

वजन कमी करण्याचं राज तिनं शेअर केलं. ती म्हणाली, ‘वजन कमी करणं माझ्यासाठी फारस कठीण नव्हतं.मी फक्त जंक फूड खायचं थांबवलं.मी ‘नूर’ सिनेमाचं शूटिंग करत होते. तेव्हा मला व्यायाम करायला वेळ नसायचा.म्हणून मी माझ्या आहारात बदल केला.’

सोनाक्षी म्हणाली की तिला आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं. पण बारीक होण्यासाठी या आवडीवर तिनं नियंत्रण ठेवलं. सोनाक्षीच्या जाडेपणावर बरीच टीकाही होतेय. यावर ती म्हणतेय, ‘मी वजनदार असतानाही दबंगसारखे हिट सिनेमेही दिले होतेच की.’

इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी सोनाक्षी सिन्हाचं वजन 90 किलो होतं.इंडस्ट्रीत पाय ठेवल्यावर वजन 60 किलो झालं.आणि आता अजूनही तिनं वजन कमी केलंय. सोनाक्षीच्या फॅन्ससाठी हा सुखद धक्का आहे.आता ‘नूर’ सिनेमाचीही उत्सुकता वाढलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close