काश्मिरमध्ये गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी यांना सीमेवर वीरमरण

October 29, 2016 1:13 PM0 commentsViews:

nitin_koli29 ऑक्टोबर : भारत पाक सीमेवर सुरू असलेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी यांना वीरमरण आलं. नितीन बीएसएफमध्ये जवान होते.

जम्मू -काश्मीरमधल्या आर एस पुरा सेक्टरमध्ये काल संध्याकाळपासून पाकची आगळीक सुरू आहे. लष्करही त्याला चोख प्रत्युत्तर देतंय. आर एस पुराच्या माच्छील भागात हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात नितीन कोळी यांनी वीरमरण आलं. त्यांचं यांचं पार्थिव उद्या दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. त्यानंतर ते सांगलीतलं त्यांचं मुळगाव असलेल्या दूधगाव इथं ते नेण्यात येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close