दारुभट्टी मुक्त आदिवासी पाडा, पोलिसांची आदिवासींसोबत अशीही दिवाळी

October 29, 2016 2:16 PM0 commentsViews:

adiwasi4429 ऑक्टोबर : देशात दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईतील काही भागात ठिकाणी असलेल्या आदिवासी भागात जाऊन तिथल्या आदिवासी जनतेबरोबर वेगळ्याप्रकारे मुंबई पोलिसांनी दिवाळी साजरी केली आहे.

भांडुप च्या पळस पाडा , खिंडी पाडा विभागातील आदिवासी बांधवांबरोबर परिमंडळ सातचे उपायुक्त राजेश प्रधान यांनी विकास मंडळ साईविहार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, निमेष तण्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वस्तिक सेवा संस्था यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन दारूबंदी, दारुभट्टी मुक्त आदिवासी पाडा हे अभियान राबविण्यात आले.

तसंच दीपावली निम्मित दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. व्यसनमुक्ती अभियानंतर्गत या ठिकाणी दारू बंदीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. या वेळी पोलीस उपायुक्त राजेश प्रधान, सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर, दत्तात्रय भरगुडे, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाणे इत्यादी पोलीस अधिका-यांनी या आदिवासी बांधवाना शपथ दिली. तर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी फराळ वाटप करून आदिवासी जनतेत दिवाळी साजरी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close