‘राजनीती’चा बोलबाला

April 29, 2010 11:36 AM0 commentsViews: 1

सोमोन मिश्रा, मुंबई

29 एप्रिल

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अजब प्रेम की गजब कहानीमध्ये एकत्र आले होते. आणि आता हे दोघे प्रकाश झांच्या 'राजनीती'मध्ये दिसणार आहेत. आम्ही त्या दोघांना गाठले. त्यावेळी दोघेही राजनीतीबद्दल भरभरून बोलत होते.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ रेडिओ स्टेशनवर आले होते, राजनीतीचा साऊंडट्रॅक लाँच करायला. या सिनेमाला प्रितम, शंतनू मोइत्रा आणि आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिले आहे.

हा सिनेमा पॉलिटिकल थ्रिलर आहे आणि सिनेमात गाणी बॅकग्राउंडला आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांचे रंजन करेल, असा विश्वास कतरिनाला वाटतोय.

रणबीर कपूर अनुराग बासुचा नवीन सिनेमा करतोय अशी चर्चा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात रणबीरची नायिका असणार आहे, दिपिका पदुकोण. अर्थात रणबीरनं यावर शिक्कामोर्तब काही केलेलं नाही.

ेकतरिनाला काही राजकीय प्रश्न विचारले गेले, तेव्हा मला दिग्दर्शकांकडून मार्गदर्शन मिळालं. याशिवाय आपण कुठल्याच सोशल नेटवर्किंग साइटवर नसल्याचंही तिनं यावेळी सांगितलं.

कुठल्याही वादात अडकायला नको याची सध्या पुरेपूर काळजी घेताना कतरिना दिसत आहे.

close